हे सुधरणार नाहीत

एक व्यक्ती मरून वर पोहचला तर स्वर्गाच्या द्वारावर त्याला स्वयं चित्रगुप्त मिळाले.

चित्रगुप्त म्हणाले, "तू एका अटीवर आत येऊ शकतोस."

व्यक्ती म्हणाला: कोणती अट देवा?

चित्रगुप्त: तुला एक शब्द जो इंग्रजी आहे त्याची स्पेलिंग बरोबर सांगावी लागेल.

व्यक्ती: कोणता शब्द देवा?

चित्रगुप्त: लव

व्यक्ती: एल ओ व्ही इ

चित्रगुप्त: फार सुंदर, तू आत येऊ शकतोस.

तो व्यक्ती आत येत होता तेवढ्यात चित्रगुप्त चा मोबाईल वाजला.

चित्रगुप्त: मला देव बोलवत आहेत, तू एक मिनिट दरवाजावर पहारा दे मी आत्ताच येतो.

व्यक्ती: जशी आपली आज्ञा देवा.

चित्रगुप्त: माझ्या अनुपस्थितीत जर कोणी प्राणी येथे येऊन पोहचला तर त्याला प्रवेश देण्या अगोदर त्यालापण 'लव' या शब्दाचे स्पेलिंग जरूर विचार, जर तो पण तुझ्या सारखा बरोबर स्पेलिंग देऊ शकला तर त्याला आत येऊ दे. नाही तर त्याला समोरील दाराने नरकात पाठव.

व्यक्ती: ठीक आहे.

एवढे बोलून चित्रगुप्त निघून गेले आणि तो व्यक्ती पहारा देऊ लागला. तेवढ्यात एक स्त्री तेथे पोहचली. ती व्यक्ती हे पाहून फार हैरान झाला की ती त्याची बायको होती.

तो म्हणाला, "अरे, तू येथे कशी पोहोचलीस?"

बायको: तुझ्या अंतिम संस्कारानंतर जेव्हा मी श्मशानातून परत येत होते तेव्हा एका गाडीने मला उडविले, त्या नंतर जेव्हा मला जाग आली तर मी येथे उभी होते. आता सरका मला आत जाऊ द्या.

व्यक्ती: असे नाही, देवाचा नियम आहे त्या नुसार तुला पहिले एका शब्दाची स्पेलिंग बरोबर सांगावी लागेल, तेव्हाच तू आत येऊ शकतेस. नाही तर तुला समोरील दाराने नरका मध्ये जावे लागेल.

बायको: कोणता शब्द?
.
.
.
.
.
.
.
व्यक्ती: चेकोस्लोव्हेकिया


जमाना बदलला 

एकदा एक वृद्ध महिला आपल्या अंगणात बसून स्वेटर विणत असते तेवढ्यात अचानक एक माणूस तिचा डोळा चुकवून तिच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवून पळून जातो.

माणसाला एवढ्या घाईमध्ये पळताना पाहून, काही लोकांना शक होतो त्यामुळे ते अंगणात पाहतात तर त्यांच्या नजरेत वृद्ध महिलेच्या खुर्ची खाली बॉम्ब ठेवलेला दिसतो.

हे पाहून ते लोक महिलेला सावध करण्यासाठी घराच्या बाहेरूनच ओरडतात, "म्हातारी बॉम्ब आहे, म्हातारी बॉम्ब आहे."

हा गोंधळ ऐकून म्हातारी एका क्षणासाठी आश्चर्यचकित होते आणि मग लाजून बोलते, "अरे आटा ती गोष्ट नाही, बॉम्ब तर मी जवानी मध्ये होते."


निरपराध चोर

एका रात्री मुल्ला नसरुद्दीनचा गाढव चोरी होतो. दुसऱ्या दिवशी मुल्ला ने गाढवाच्या बद्दल शेजाऱ्याकडे चौकशी केली.

चोरी ची बातमी ऐकून शेजाऱ्यांनी मुल्लाला झिडकारायला सुरुवात केली. एक म्हणाला, "तू सावध राहीला असतास तर चोर गाढव चोरी करू शकला नसता. "

दुसरा म्हणाला, "तू रात्री पहारा का नाही करत. तू काळजी घेतली असतीस तर गाढव चोरीला गेला नसता."

तिसरा म्हणाला, "तू रात्री मेल्यासारखा झोपतोस, तेव्हाच तुला काहीही ऐकायला आले नाही जेव्हा चोर दरवाजाची कडी सरकवून गाढव घेऊ गेला."

हे सर्व ऐकून मुल्ला रागात लाल होऊन म्हणाला, "ठीक आहे मित्रांनो, तसे तुम्ही सर्व खरेच म्हणत आहात, सर्व अपराध तर माझाच आहे आणि चोर बिचारा तर एकदम निरपराध आहे."

Share To:

Post A Comment: