लांब केसांसाठी बाहेरील उत्पादन वापरण्या पेक्षा घरगुती वस्तू वापरून तुम्ही लांब केस करू शकता.
  • केस लांब करण्यासाठी जरुरी आहे की तुम्ही केसाना वेळोवेळी तेल मालिश करा. म्हणजेच आठवड्यातून कमीत कमी २ वेळा तेल लावा नुसते तेल लावू नका तर केसाना मालिश करा या मुळे तेल केशांच्या मुळा पर्यंत जाईल.

  • केसाना पोषण मिळेल तेव्हाच केसांची वाढ होईल. अश्यावेळी केशाना एक दोन महिन्यातून तुम्ही मेहंदी लावू शकता.
  • जर तुम्ही केस लांब करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर केसाना कलर करणे , केस स्ट्रेटनिंग करणे, प्रेस करणे टाळा यामुळे केसाना नुकसान होईल.
  • आवळा केसांसाठी चांगले असते म्हणून आवळा खाण्या सोबतच केसाना आवळ्याचा पैक करून लावा यामुळे केसाना चांगले पोषण मिळेल आणि केस लांब होतील केसांचे आरोग्य चांगले होईल.
  • मेथीच्या दाण्याची पेस्ट करून लावल्यास केस लांब आणि घनदाट होतील.
  • केसाना कंडीशनिंग करण्यासाठी शिकाकाई लाभदायक असते.
Share To:

Amit Velekar

Post A Comment: